३१ ते ४० ची ओळख व लेखन

प्रस्तावना ३१ ते ४० ची ओळख व लेखन

views

4:32
३१ ते ४० ची ओळख व लेखन: आपण मागील पाठात एकवीस ते तीस हे आकडे शिकलो. आता आपण ३१ ते ४० ह्या संख्या शिकणार आहोत. चला तर मग करूया सुरवात. शि: या पहा माझ्या हातात काही माचीसच्या काड्या आहेत. त्या कोण मोजून दाखवेल? वि: सर, मी! शि:बरं. वि: १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,१९,२०,२१,२२,२३,२४,२५,२६,२७,२८,२९,३०,३१ सर ह्या ३१ काड्या आहेत. शि: बरोबर! आता या ३१ काड्यांतून दशक तयार होतो का ते पहा? वि: हो सर. हे पहा १० – १० काड्यांचे ३ गठ्ठे तयार झाले. आणि ही १ काडी शिल्लक राहिली. शि: छान! आपण दशकाचे लेखन कसे करायचे ते शिकलो आहोत. मग मला सांगा या ३१ मध्ये दशक म्हणजेच गठ्ठे किती आहेत? वि: सर ३ गठ्ठे आहेत. शि: बरोबर! म्हणून मी दशकाच्या घरात ३ लिहिला. आता एकक म्हणजे सुट्ट्या काड्यां किती आहेत? वि: सर सुट्टी काडी एकच आहे. शि: बरोबर! म्हणून मी एककाच्या घरात १ लिहिला. म्हणजेच मुलांनो ३० आणि १ होतात एकतीस. किंवा तुम्ही असेही म्हणू शकता तीन दशक आणि एक एकक मिळून झाले एकतीस. आणि ३१ या संख्येचे लेखन ३१ असे करतात. अशा प्रकारे पुढील ३१,३२,३३,३४,३५,३६,३७,३८,३९,४० पर्यंत संख्या तुम्ही सहज तयार करू शकता.