३१ ते ४० ची ओळख व लेखन

रिकाम्या जागा भरा

views

2:13
३१ ते ४० या संख्यांचे वाचन केले. तर मग आता मला रिकाम्या जागा सांगा पाहू. शि: पुढील संख्या कोण पूर्ण करणार? पहा मुलांनो या चित्रात तीन बदकं दिली आहेत. त्यामध्ये पहिल्या बदकात ३६ आणि तिसऱ्या बदकात ३८ ही संख्या दिली आहे तर मग मधल्या बदकात कोणती संख्या येईल? वि: सर, छत्तीस, सदतीस आणि अडतीस. शि: बरोबर! मधली संख्या सदतीस आहे. मग आता शेवटचा प्रश्न. याठिकाणी चार घरं दिली आहेत, त्यात तिसऱ्या घरात १४ ही संख्या दिली आहे. आणि चौथ्या घरात १५ ही संख्या दिली आहे. तर मग पहिल्या आणि दुसऱ्या घरात आधी लगत येणाऱ्या दोन संख्या कोणत्या असतील बरं? वि: सर, १२, १३ आणि मग १४, १५. शि: शाब्बास! छान उत्तरे दिलीत तुम्ही. मुलांनो, आज आपण ३१ ते ४० या संख्यां लिहायला आणि वाचायला शिकलो.