वर्तुळ

वर्तुळकंस

views

4:46
वर्तुळकंस :मुलांनो, आता आपण वर्तुळकंसाविषयी माहिती मिळवूया. पाहा ही वर्तुळाकार बांगडी आहे. जर या बांगडीला आपण मध्येच कट केले तर त्या बांगडीचे दोन भाग तयार होतील. म्हणजेच आकृती २ मधील बांगडीचा आकार हा अर्धवर्तुळासारखा दिसतो. या आकृतीत AB या व्यासामुळे पूर्ण वर्तुळाचे दोन भाग तयार झाले आहेत. तर वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूमुळे वर्तुळाचे दोन भागत विभाजन होते त्या प्रत्येक भागाला वर्तुळ कंस असे म्हणतात. हया आकृतीत AB हा वर्तुळाचा व्यास आहे. व्यासामुळे वर्तुळाचे दोन्ही कंस समान होतात. त्यांना अर्धवर्तुळकंस म्हणतात. लघुकंस आणि विशालकंस: या आकृतीमध्ये AB या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत. एक भाग लहान आणि एक मोठा दिसतोय. या दोन्ही भागांपैकी कंस AXB हा लहान आहे. म्हणून त्यास लघुकंस असे म्हणतात. तर कंस AYB हा मोठा आहे. म्हणून त्यास विशालकंस असे म्हणतात. संगतकंस = ज्या दोन वर्तुळ कंसांचे अंत्यबिंदू सामाईक असतात आणि ते दोन वर्तुळ कंस मिळून एक पूर्ण वर्तुळ तयार होते, त्या दोन कंसांना परस्परांचे संगतकंस असे म्हणतात. केंद्रीय कोन: वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात.