सांख्यिकी

सरासरी

views

4:36
सरासरी: मुलांनो, आज आपण सांख्यिकी म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण सरासरी म्हणजे काय हे समजून घेऊया. मागील इयत्तेत आपण सरासरी कशी काढायची याचा अभ्यास केला होता. त्याची उजळणी म्हणून आता आपण त्याविषयी थोडी चर्चा करूया. जेव्हा आपण सरासरी काढतो, तेव्हा आपल्याला दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करून त्यास एकूण संख्येने भागले असता सरासरी मिळते. चला तर मुलांनो, आपण काही उदाहरणे सोडवूया. उदा. एका शाळेने, विद्यार्थ्यांचे घर शाळेपासून किती दूर आहे. हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. त्यापैकी खाली सहा विद्यार्थ्यांचे त्यांच्या घरापासूनचे अंतर दिले आहे. त्या अंतरांची सरासरी काढूया. 950 मी 800 मी 700 मी 1.5 किमी 1 किमी 500 मी उत्तर :- उत्तर: मुलांनो, आपण पाहिले की विद्यार्थ्यांची शाळा आणि घर यातील अंतराची सरासरी काढण्यासाठी आपल्याला अंतरे दिली आहेत. या उदाहरणात काही अंतरे ही मीटरमध्ये तर काही किलोमीटरमध्ये दिली आहेत. तर मग आपण सर्व अंतरे एकाच एककात करून घेऊ. म्हणजेच इथे ज्यांचे अंतर किलोमीटरमध्ये दिले आहे त्यांचे मीटरमध्ये रूपांतर करताना 1 किलोमीटर = 1000 मी. आणि 1.5 किलोमीटर = 1500 मी असे होईल. आता आपल्याला सर्व अंतरे ही एकाच एककामध्ये मिळाली आहेत. म्हणून आता आपण या सर्वांची सरासरी काढूया. सरासरी काढताना आपण सर्व विद्यार्थ्यांच्या घरांपासून शाळेपर्यंतच्या अंतरांची यांची बेरीज करून आलेल्या उत्तराला एकूण विद्यार्थांच्या संख्येने भागू देऊ या. सरासरी = (विद्यार्थ्यांच्या घरापासून शाळेपर्यंतच्या अंतरांची बेरीज)/(एकूण विद्यार्थी) = (950+800+700+1500+1000+750)/6 = 5700/6 = सरासरी = 950 मीटर. म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांचे घर आणि शाळा यांमधील सरासरी अंतर 950 मीटर आहे.