सांख्यिकी Go Back वारंवारता वितरण सारणी views 4:24 वारंवारता वितरण सारणी (Frequency distribution table): मुलांनो, आपण सरासरी कशी काढायची ते पाहिले. आता आपण वारंवारता वितरण सारणीचा अभ्यास करूया. कधी कधी दिलेल्या माहितीमध्ये काही प्राप्तांक अनेक वेळा येतात. एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची वारंवारता असे म्हणतात. अशा वेळी वारंवारता सारणी तयार करतात. या सारणीमध्ये प्राप्तांक, ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता असे तीन स्तंभ असतात. वारंवारता वितरण सारणी समजण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना : प्राप्तांकाचे वर्गीकरण सोप्या पद्धतीने करण्यासाठी ताळ्याच्या खुणांचा वापर करता येतो. खुणांची संख्या वारंवारता दाखवते, अशा प्रकारच्या सारणीला वारंवारता सारणी असे म्हणतात. प्राप्तांकाची संख्या मोठी असते त्यावेळी वारंवारता सारणीचा उपयोग सरासरी काढण्यासाठी होतो. सरासरी चला चर्चा करूया. वारंवारता वितरण सारणी वारंवारता उदाहरणे