राज्यशासन

विधानसभा

views

3:28
कलम १७० नुसार प्रत्येक घटकराज्यासाठी विधानसभेची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे विधानसभा हे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे. राज्यांच्या विधानसभेत कमीत-कमी ६० व जास्तीत जास्त ५०० सदस्य असून दर लाख लोकसंख्येस एक सदस्य निवडून दिला जातो. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या २८८ इतकी आहे. अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल, किंवा त्या समाजातील सदस्य निवडून आला नसेल, तर राज्यपाल त्या समाजाचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी काही जागा राखीव असतात. निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वेगवेगळ्या मतदारसंघांत विभाजन केले जाते. त्याला इंग्रजीत वोंर्ड असे म्हणतात. अशा प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडला जातो. विधानसभेची मुदत पाच वर्षांची असते. काही अपवादात्मक परिस्थितीत विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात. उदा: मुख्यमंत्री व मंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यास मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात. वयाची २५ वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला तो महाराष्ट्रात राहत असल्यास विधानसभेची निवडणूक लढवता येते. तसेच संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असाव्यात.