महाराष्ट्र राज्याची निर्मिती Go Back संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना views 3:51 ३ फेब्रुवारी १९५६ रोजी मराठी भाषिकांच्या ‘महाराष्ट्र राज्य’ निर्मितीसाठी ‘संयुक महाराष्ट्र समिती’ ची स्थापना करण्यात आली. मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न जास्तच गंभीर होत गेला. त्याबद्दल राज्यभर असंतोष धुमसत होता. यासाठी ६ फेब्रुवारी १९५६ रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली. यात समितीने आपली कार्यकारिणी (वर्किंग कमिटी) जाहीर केली. त्यानुसार अध्यक्षपदी कॉ. श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्ष डॉ. त्र्य. रा. नरवणे तर सचिवपदी एस.एम.जोशी यांची निवड करण्यात आली. या समितीची स्थापना करण्यात ग.त्र्यं.माडखोलकर, आचार्य प्र.के.अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव ठाकरे, य.कृ.सोवनी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यांच्याबरोबरच सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचे योगदान दिले. त्यांनी हे आंदोलन महाराष्ट्रातील खेडयापाडयांपर्यंत पोहचवले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनाचे घोषवाक्य ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ हे होते. प्रस्तावना राज्य पुनर्रचना आयोग संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना पुढील भाग