महाराष्ट्र राज्याची निर्मिती Go Back संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना पुढील भाग views 3:04 संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे, वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या निदर्शनांमुळे केंद्र सरकार महाराष्ट्र निर्मितीस अनुकूल झाले. या प्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी यांनी आपले वजन संयुक्त महाराष्ट्राच्या पारडयात टाकले. त्यांनी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र हे एकभाषिक राज्य निर्माण करण्यास पाठिंबा दर्शविला. त्याआधारे महाराष्ट्र व गुजरात या दोन प्रांतांच्या रचनेस केंद्र सरकारने परवानगी दिली. एप्रिल १९६० मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. १ मे १९६० रोजी पहाटे राजभवनात झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची शासनाकडून अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली. अशाप्रकारे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. भाषावार प्रांतरचनेच्या चौकटीत महाराष्ट्र निर्माण झाला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या सर्व चळवळीतील सर्वात मोठी चळवळ होती. प्रस्तावना राज्य पुनर्रचना आयोग संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना पुढील भाग