बहुपदींचा भागाकार

प्रस्तावना

views

3:44
मागील इयत्तेमध्ये आपण बैजिक राशी आणि त्यावरील क्रियांचा अभ्यास केला आहे. तर आता आपण त्यावर आधारित आपण काही उदाहरणे सोडवूया. 1) 2a + 3a = 5a 2) 7b – 4b = 3b 3) 3P x P2 = 3P3 4) 5m2 x 3m2 = 15m4 बहुपदीची ओळख: या पाठात आपण बहुपदीची ओळख करून घेणार आहोत. एका चलातील बैजिक राशींच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा पूर्ण संख्या असेल तर ती राशी एका चलातील बहुपदी असते. उदाहरणार्थ: x 2 + 2 x + 3, 3y3 + 2y2 + y + 5 या बैंजिक राशी एका चलातील बहुपदी आहेत. बहुपदी या विशिष्ट बैजिक राशीच असतात. म्हणून बहुपदींवरील बेरीज, वजाबाकी व गुणाकार या क्रिया बैजिक राशींप्रमाणेच केल्या जातात. खालील उदाहरणाद्वारे आपण ते समजून घेवूया.