धातू – अधातू

प्रस्तावना

views

4:58
आपण आपल्या रोजच्या जीवनात धातूंच्या विविध वस्तू वापरत असतो. धातूपासून बनवलेली भांडी आपण स्वयंपाक करण्यासाठी वापरतो. तसेच आपण छान दिसावे म्हणून सोने, चांदी या धातूचे दागिने वापरतो. आपली वाहने, फर्निचर इतकेच काय कुलूप – बिजागऱ्याकड्या याही धातुच्याच असतात. धातू व अधातू या संज्ञा संपूर्णपणे मूलद्रव्याशी संबंधित आहेत. मूलद्रव्यांचे वर्गीकरण हे तीन प्रकारांत केले जाते, धातू, अधातू व धातूसदृश.