धातू – अधातू

धातूचे भौतिक गुणधर्म भाग 2

views

4:27
धातूंचे भौतिक गुणधर्म भाग 1: धातूचे अवस्था, तेज, कठीणपणा, तन्यता, वर्धनीयता, उष्णतेचे वहन, विद्युत वहन, घनता, द्रवणांक व उत्कलनांक आणि नादमयता असे विविध गुणधर्म आहेत. तर सर्वप्रथम आपण धातूंच्या अवस्थेविषयी माहिती घेऊया. 1) अवस्था: धातू हे आपल्याला स्थायू अवस्थेतच दिसून येतात. मात्र काही धातू हे धातूच्या या अवस्थेला अपवाद आहेत. जसे गॅलिअमसारखे व पाऱ्यासारखे धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात. 2) तेज (Luster) चकाकी: तुम्ही धातुचे भांडे लिंबाने किंवा राखेने घासलेले पाहिले आहे का? घासल्यानंतर ते भांडे चकाकते व त्या भांडयावरून प्रकाशाचे परावर्तन होताना दिसून येते. त्यामुळे धातूंची भांडी ही तेजस्वी दिसतात. 3) कठीणपणा: तुम्ही अॅल्युमिनियमची, स्टीलची भांडी पाहिली असतील. ती भांडी एकदम कठीण भांडी असतात. सर्वसाधारणपणे जो मूळ धातू असतो, तो मऊ नसतो. धातू कठीण असतात. अपवाद सोडिअम व पोटॅशिअम हे धातू मात्र मऊ असतात व ते चाकूने सहजपणे कापता येतात. 4) तन्यता: तुम्ही धातूंच्या तारा पहिल्या असतील. तुमच्या घरातील वायर्समध्ये विजेच्या वेष्ठणाच्या आतमध्ये विद्युत वाहून नेण्यासाठी ज्या तारा असतात त्या धातूपासून तयार केलेल्या असतात.