धातू – अधातू

अधातू

views

3:57
अधातू: मुलांनो, आता आपण अधातूंविषयी माहिती घेऊया. अधातूंचे गुणधर्म धातूच्या गुणधर्माच्या विरुद्ध असल्याचे दिसून येतात. धातू ज्याप्रमाणे चमकतात, कठीण असतात तसे अधातूचे नसते. अधातू हे ठिसूळ असतात व त्यांना चकाकी नसते. ते वर्धनीय नसतात. कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे अधातू आहेत. अधातूंचे भौतिक गुणधर्म: 1)भौतिक अवस्था: स्थायू, द्रव व वायू या अवस्थांचा विचार केला तर सर्वसामान्य तापमानात अधातू हे या तिन्ही अवस्थेत आढळून येतात. उदा: स्थायू: कार्बन(C), सल्फर(S), फॉस्फरस(P). द्रव: ब्रोमीन (Br2) वायु: तर वायुअवस्थेमध्ये हायड्रोजन(H2), ऑक्सिजन(O2), नायट्रोजन(N2) हे अधातू आपल्याला आढळून येतात. चकाकी: अधातूंना चकाकी नसते म्हणजेच अधातू हे चमकत नाहीत. तन्यता व वर्धनीयता: अधातूची आपल्याला बारीक तार काढता येत नाही. म्हणजेच अधातूंमध्ये तन्यता हा गुणधर्म नसतो. उष्णता व विद्युत वहन: अधातूंमधून उष्णता वाहून नेली जात नाही. तसेच विद्युतही वाहून नेता येत नाही, म्हणून अधातूला उष्णता व विजेचे दुर्वाहक म्हणून ओळखले जाते. घनता: अधातूची घनताही खूपच कमी असते. द्रवणांक व उत्कलनांक: अधातूचे द्रवणांक व उत्कलनांक खूपच कमी असतात. मात्र कार्बन, बोरॉन हे स्थायू स्थितीतील अधातू या गोष्टीला अपवाद आहेत.