धातू – अधातू

धातूंचे रासायनिक गुणधर्म

views

4:04
धातूंचे रासायनिक गुणधर्म: मुलांनो, आता आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म पाहूया. इलेक्ट्रॉन संरूपण: मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म हे इलेक्ट्रॉन संरूपणावर अवलंबून असतात. त्यामुळेच ठराविक अंतराने त्या गुणधर्माची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येते. इलेक्ट्रॉन संरूपण हे मूलद्रव्याच्या रासायनिक वर्तनाचा आधार असतो. बहुसंख्य धातूंच्या अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रोनची संख्या ही कमी असते. म्हणजेच तीन पर्यंत असते. ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया: अभिक्रिया म्हणजे संयोग पावणे. धातूंचा ऑक्सिजनबरोबर संयोग होऊन त्याची ऑक्साइडे तयार होतात. म्हणजेच, धातू + ऑक्सिजन  धातूचे ऑक्साईड धातूची ऑक्साइडे ही आम्लारीधर्मी असतात.धातूंच्या ऑक्साइडची अभिक्रिया आम्लासोबत होऊन क्षार व पाण्याची निर्मिती होते. म्हणजेच धातूचे ऑक्साइड+आम्ल  क्षार +पाणी. पाण्यासोबत अभिक्रिया: काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होते. त्यामुळे हायड्रोजन वायूची निर्मिती होते. काही धातूंची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला तर काही धातूंची गरम पाण्यासोबत तर काही धातूंची अभिक्रिया ही पाण्याच्या वाफेसोबत होते. मात्र ही अभिक्रिया घडत असताना त्या अभिक्रीयेचा दर हा वेगवेगळा असतो.