धातू – अधातू

अधातूंचे रासायनिक गुणधर्म

views

5:25
अधातूंचे रासायनिक गुणधर्म: आता आपण अधातूंचे रासायनिक गुणधर्म अभ्यासूया. अधातू हे इलेक्ट्रॉन मिळवून ऋण आयन निर्माण करतात. तसेच अधातूंच्या ऑक्साइडची आम्लारीबरोबर अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात. तर आता आपण अधातुंची अधिक माहिती गुणधर्माच्या आधारे अभ्यासूया.इलेक्ट्रॉनी संरुपण: बहुसंख्य अधातूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जास्त म्हणजे 4 ते 7 पर्यंत असते. आयनाची निर्मिती: अधातूमध्ये संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण प्रभारी आयन, ऋण आयन म्हणजेच ‘अॅनायन’ निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. म्हणजेच अधातू हे इलेक्ट्रॉन मिळवून ऋण आयन निर्माण करतात. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया: अधातूंचा ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यांची ऑक्साइडे तयार होतात. त्यासाठी ही अभिक्रिया पहा. अधातू + ऑक्सिजन अधातूचे ऑक्साईड. अधातूची ऑक्साईडे ही आम्लधर्मी असतात. त्यांचा आम्लारीशी संयोग घडून आल्यानंतर क्षार आणि पाणी तयार होते.