धातू – अधातू

राजधातू

views

3:09
राजधातू: सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडिअम, व ऱ्होडिअम यांसारखे धातू हे निसर्गात मूलद्रव्याच्या स्वरुपात आढळून येतात. या धातूंवर हवा, पाणी, उष्णता, वातावरण यांचा सहजासहजी परिणाम होत नाही. म्हणून या धातूंना “राजधातू” असे म्हणतात. त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही. राजधातूंचे उपयोग: 1)आपण सोने, चांदी, प्लॅटिनम या राजधातूंचा उपयोग अलंकार बनवण्यासाठी करतो. 2)चांदीचा उपयोग विविध प्रकारच्या औषधांमध्ये केला जातो. कारण चांदीमध्ये विविध प्रकारच्या रोगांपासून वाचवण्याची क्षमता असते. चांदीचा उपयोग आयुर्वेदामध्ये विविध प्रकारच्या औषधीमध्ये केला जातो. 3)आपण विविध स्पर्धा पाहतो. त्यामध्ये पदके दिली जाताना तुम्ही पाहिली असतील या पदकांसाठी सोने, चांदी वापरली जाते. 4)काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्येही सोने, चांदी या राजधातुंचा उपयोग केला जातो. 5)प्लॅटिनम, पॅलेडिअम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून केला जातो. त्याचप्रमाणे अॅल्युमिनिअम या धातूप्रमाणेच सोने व चांदी हे उत्तम प्रकारे वर्धनीय धातू आहेत.