आपत्ती व्यवस्थापन

भूकंपाची कारणे

views

3:30
भूकंप या शब्दाचा शब्दश: अर्थ पाहिला तर ‘भू’ म्हणजे जमीन व ‘कंप’ म्हणजे हादरणे. म्हणजे जमीन हालली की आपण भूकंप झाला असे म्हणतो. भूकवचात अचानक होणारी कंपने म्हणजेच भूकंप होय. या भूकंपामुळे-भूगर्भातील हालचालीमुळे- जमीन थरथरते व जमिनीला भेगा पडतात. जमीन थरथरते तेव्हा आपण भूकंप झाला असे म्हणतो. भूकंपाची कारणे :- १) ज्वालामुखीचा उद्रेक होऊन भूकंप होण्याची शक्यता असते. २) पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी मोठ–मोठी धरणे बांधली जातात. धरणातील पाण्याच्या वजनामुळे जमिनीवर ताण पडतो व भूकंपाची शक्यता वाढते. ३) खाणकाम केल्यामुळे जमिनीचा भराव कमी होतो व माती मोकळी होते. त्यामुळेही भूकंप होऊ शकतो. 4) त्याचप्रमाणे अणू चाचण्या जमिनीत खोलवर घेतल्या जातात. त्यामुळेही भूकंप होण्याची शक्यता वाढते. ५) जमिनीवर साचणारे पाणी हे भूपृष्ठातून खाली झिरपते. जमिनीच्या आतमध्ये असणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे या झिरपलेल्या पाण्याची वाफ होते. ही वाफ जमिनीच्या कमकुवत पृष्ठभागातून वर येण्याचा प्रयत्न करते. त्यामूळे भूकंप होण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रकारे विविध कारणांनी भूकंप होऊ शकतो.