आपत्ती व्यवस्थापन

आग विझवण्याच्या पद्धती

views

3:33
तुम्हाला माहीत आहे की वेगवेगळया प्रकारच्या आगी विझवण्यासाठी पद्धतीही वेगवेगळया वापरल्या जातात. कारण आगीचे कारणही वेगळे असते. सर्वसामान्यपणे आग विझवण्यासाठी तीन पद्धती वापरल्या जातात. १) थंड करणे :- आग विझवण्यासाठी सगळयात प्रभावी साधन म्हणजे पाणी. पाणी हे सर्वच ठिकाणी मिळते. त्यामुळे आग लागल्यानंतर आगीवर पाणी मारले जाते. किंवा आगीच्या आजूबाजूला पाणी मारून थंडावा निर्माण केला जातो. कारण आग त्यामुळे पसरत नाही व जास्त प्रमाणात होणारे नुकसान टाळले जाते. २) आगीची कोंडी करणे :- वाळू व मातीचा वापर करून तेल व विजेमुळे लागलेली आग विझवता येते. त्याचप्रमाणे फेसासारखा पदार्थ अशा प्रकारच्या आगीवर फेकला तर आग विझवण्यासाठी मदत होते. ही पद्धत तेलामुळे लागलेल्या आगीवर खूपच परिणामकारक उपयोगी येते. आगीवर वाळू-माती वा फेस टाकल्यामुळे त्याचा पांघरूणासारखा उपयोग होतो. आगीला होणारा हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा थांबला की आग विझते. ३) ज्वलनशील पदार्थ हलवणे :- या पद्धतीमध्ये ज्वलनंशील पदार्थच आगीपासून वेगळे केले जातात. कारण लाकडी सामान किंवा पेट घेणाऱ्या वस्तूच जर आगीपासून वेगळया केल्या तर आगीचे भक्ष्यच नाहीसे होते. जर नुकतीच आग लागली असेल तर ती विझवण्यासाठी ‘स्ट्रीरप पंप’ हे एक उत्तम साधन आहे. या पंपाद्वारे आगीवर सर्व बाजूने पाण्याचा मारा केला जातो आणि आग विझवली जाते. आग विझविण्यासाठी अशा विविध पद्धतींचा वापर केला जातो. योग्य पद्धत वापरून आग विझवणे महत्त्वाचे असते.