आपत्ती व्यवस्थापन

दरड कोसळणे

views

4:04
आता आपण दरड कोसळणे किंवा भूस्खलन या आपत्तीविषयी माहिती घेऊ या. तुम्ही पावसाळ्यात काही वेळा बातम्या ऐकल्या असतील की “अमुकठिकाणी दरड कोसळली किंवा एखाद्या ठिकाणी भूस्खलन झाले. भूस्खलन म्हणजे नेमके काय? तर जमीन खचून जाणे म्हणजे म्हणजे भूस्खलन होय. दरड कोसळणे किंवा भूस्खलनाला नैसर्गिक कारणे असू शकतात तसेच अप्रत्यक्षपणे काही मानवी कृतीही या आपत्तीला कारणीभूत ठरतात. मोठ्या प्रमाणात मातीचा ढीग किंवा खडक फुटून एखादा कडा पूर्णपणे कोसळतो यालाच दरड कोसळणे असे म्हणतात. दरड कोसळणे किंवा भूस्खलन या आपत्तीला भूकंप, पूर अशी नैसार्गिक कारणे असतात. किंवा मानवाच्या काही कृतीही याला जबाबदार असतात. नैसर्गिकरीत्या कठीण पाषाणात म्हणजेच खडकात भेगा व फटी असतात. या भेगा व फटींमुळे खडकाचे तुकडे होतात. जास्त पावसामुळे या खडकाच्या भेगा किंवा फटीमध्ये पाणी जाते व खडकाची झीज होते. पाणी त्यामध्ये साचून राहिल्याने खडकाचे वजन वाढते व खडक उताराच्या दिशेन घसरतात व खालील बाजूस जाऊन स्थिरावतात. यालाच आपण दरड कोसळली असे म्हणतो.