आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती निवारण-नियोजन आराखडा

views

2:07
तुम्हाला माहीत आहे की नियोजन केल्यामुळे काम अगदी सहजपणे पार पडू शकते. शाळेच्या आपत्ती निवारणाच्या बाबतीत नियोजन आराखडा असेल तर मदत कार्य वेळेवर पोहचवता येते. 1) राष्ट्रीय भूकंप संस्था (National Center Of Seismology- N C S) या संस्थेमार्फत भूकंप व विविध आपत्तीसंदर्भात संशोधनाचे कार्य केले जाते व ही संस्था केंद्रशासनाच्या भू-विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. 2) भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज घेण्यासाठी भारत सरकारने इंडियन माऊंटनियरिंग इन्स्टिट्यूट व इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटन डेव्हलपमेंट या संस्थांशी अनुसंधान करून कार्यक्रम सुरु केला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ जिऑलॉजी व वर्ल्ड जिऑलॉजिकल कोरम या संस्थांची त्या संदर्भात संशोधन करण्यासाठी मदत घेतली जाते. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनासाठी आपण पोलीस 100, अग्निशमन दल-101, रुग्णवाहिका -102, आणि आपत्ती नियंत्रण कक्ष-108 यांच्याशी संपर्क बचाव व मदत कार्य करू शकतो.