एकचल समीकरणे

प्रस्तावना

views

2:46
मागील इयत्तेपासून आपण विविध समीकरणांचा अभ्यास करत आलोय. त्यावरील उदाहरणे सोडवली आहेत. याच पूर्वज्ञानावर आधारित आपण एकचल समीकरणावर आधारित उदाहरणांचा विस्तारपूर्वक अभ्यास या पाठात करायचा आहे, मुलांनो, समीकरणे सोडवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे जरुरीचे असते. 1) समीकरणात दिलेल्या चलासाठी जी किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात. ती किंमत म्हणजे त्या समीकरणाची उकल असते. 2) समीकरण सोडवणे म्हणजे त्याची उकल शोधणे होय. 3) समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण सत्य असते. या गुणधर्माचा वापर करून आपण नवीन सोपी समीकरणे तयार करून दिलेले समीकरण सोडवतो. समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर करण्याच्या क्रिया: i) दोन्ही बाजूस समान संख्या मिळवणे.ii) दोन्ही बाजूंतून समान संख्या वजा करणे iii) दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे iv) दोन्ही बाजूंना समान संख्येने भागणे