चक्रवाढ व्याज Go Back चक्रवाढव्याजाच्या सूत्राचे उपयोजन views 4:16 आता आपण चक्रवाढव्याजाच्या सूत्राचे उपयोजन कसे करायचे ते पाहू. चक्रवाढव्याजाने रास काढण्याच्या सूत्राचा उपयोग दैनंदिन जीवनातील इतर क्षेत्रांतील उदाहरणे सोडवण्यासाठीही करता येतो. जसे लोकसंख्येतील वाढ, एखादया वाहनाची दरवर्षी कमी होणारी किंमत इत्यादी. एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी होते. कमी होणाऱ्या किमतीला घट किंवा घसारा असे म्हणतात. किमतीतील घसारा ठराविक काळात ठराविक दराने होत असतो. उदा. यंत्राची किंमत दरवर्षी ठराविक टक्क्यांनी कमी होते. काही काळानंतर कमी झालेली किंमत काढण्यासाठी चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचा उपयोग होतो. ही किंमत काढण्यासाठी घसा-याचा दर (R) हा ऋण घेतात. मुलांनो, चक्रवाढव्याजाच्या सूत्राचे उपयोजन करून त्यासंदर्भात आता आपण काही उदाहरणे समजून घेऊया. हे लक्षात ठेवा की, शाब्दिक उदाहरणे सोडविताना गणिती क्रिया अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असते प्रस्तावना व्याज उदाहरणे चक्रवाढव्याजाच्या सूत्राचे उपयोजन चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी