चक्रवाढ व्याज

चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी

views

3:55
चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणीच्या सूत्रातील A,P,N,R, या चार बाबींपैकी तीन बाबी दिल्यास चौथी बाब कशी काढायची ते आता पाहूया. 1) एका रक्कमेची द.सा.द.शे 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6655 रूपये रास होते. तर ती रक्कम काढा? उकल: मुलांनो, वरील उदाहरणात (रास) A =6655 रु आहे. दर (R) = 10%, मुदत(N)= 3 वर्ष आहे, मूददल (P) = काढायची आहे. मग आता चक्रवाढ व्याजाचे सूत्र लिहू. A = P x (1 + R/100)N(दिलेल्या सूत्रात किंमती लिहू.) 6655 = P x (1 + 10/100)3(100 व 1 चा गुणाकार करूया व त्यात 10 मिळवू व छेद 100 तसाच ठेवू). 6655 = P x (110/100)3 (110 व 100 ला अतिसंक्षिप्त रूप देवू). 11 x 10 = 110 व 10 x 10 = 100 म्हणून 11/10 उत्तर मिळेल. 6655 = P x (11/10)3(P ची किंमत काढायची आहे. म्हणून 6655 बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेसघेवू व 11 छेद 10 चे गुणाकार व्यस्त करू.) P = 6655 x (10/11)3 P = (6655x 〖10〗^3)/(11 x 11 x 11)(तीनही 11 ने 6655 ला भाग देवू. 5 उत्तर आले). P = 5 x 103(10 चा घन= 1000) P = 5 x 1000P = 5000 रूपये म्हणून ती रक्कम 5000 रुपये आहे.