मानवी शरीर व इंद्रिय संस्था

प्रस्तावना

views

3:34
मानवाची गणना ही सस्तन प्राण्यामध्ये केली जाते. सर्व प्राण्यांमध्ये मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. मानवी जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मानवी शरीराच्या रचनेची माहीती करून घेणे गरजेचे आहे. मानवी शरीराचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी मानवी शरीरामध्ये विविध संस्था कार्यरत असतात. त्या संस्थेंविषयी आपण या आधीही माहीती अभ्यासली आहे. तर मला सांगा इंद्रिये व इंद्रिय संस्था कशापासून बनलेल्या असतात? आपल्या शरीरातील जीवनक्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक इंद्रिये समूहाने आपली कामे करत असतात. या जीवनप्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे असतात. एका विशिष्ट टप्प्यांवर विशिष्ट इंद्रीये आपले काम करत असतात. एखादे ठराविक काम एकत्रितपणे पूर्ण करणाऱ्या इंद्रिय समूहाला ‘इंद्रियसंस्था’ असे म्हणतात.