मानवी शरीर व इंद्रिय संस्था

सांगा पाहू

views

5:43
सांगा श्वसन संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश होतो? घसा, स्वरयंत्र, श्वासनलिका, श्वसनी, श्वासनलिका, फुफ्फुसे तसेच नाकपुड्या व तोंड. नाकपुड्यापासून श्वसनाचा मार्ग सुरु होतो. व तोंडाद्वारे ती हवा आत घेतली जाते. व त्यानंतर वरील इंद्रियांतून श्वसनाचा प्रवास होतो. जेवताना बोलू नये कारण ठसका लागण्याची भीती असते. कारण मुख्यमार्ग व नाकपुड्यांचा मार्ग हा घशाच्या आतील भागात असतो. त्या ठिकाणापासून अन्ननलिका आणि श्वासनलिका सुरु होते. या दोन्ही नलिकांच्या सुरुवातीला अधिकंठ ही झडप असते. आपण जेवत असताना अन्नाचे घास घशातून अन्ननलिकेत जातात त्यावेळी श्वसननलिकेवर झडप बसते. आपण जेवताना बोललो तर अधिकंठाची हालचाल होते व त्यामुळे ठसका लागतो. म्हणून जेवताना आपण शांत राहून जेवण करायला पाहिजे. मानवी शरीरात श्वसन हे खूप-खूप महत्त्वाचे आहे. या श्वसनाचा मार्ग हा श्वसनसंस्थेवर अवलंबून असतो. तर आता आपण श्वसनसंस्थेविषयी माहिती घेऊया.