मानवी शरीर व इंद्रिय संस्था

रक्ताभिसरण संस्था

views

4:06
रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय, धमन्या, शिरा, रक्तकेशीका, रक्त पेशी यांचा समावेश होतो. यांपैकी हृदय व रक्तवाहिन्या ही इंद्रिये आहेत. तर आता आपण या रक्ताभिसरण संस्थेविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. शरीरातील रक्ताच्या साहाय्याने एका भागातून शोषून घेतलेले पदार्थ किंवा वायू दुसऱ्या भागाकडे पोहचवणे म्हणजेच रक्ताभिसरण होय. रक्ताभिसरणाची संस्था ही शरीरात कार्यरत असते. शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन, विद्राव्य, अन्नघटक, टाकाऊ पदार्थ असे विविध पदार्थ वाहून नेले जातात. हे पदार्थ वाहून नेण्याचे कार्य रक्ताभिसरण संस्था करते. मानव व प्राण्यांमध्ये रक्ताभिसरणासाठी स्वतंत्र संस्था असते. रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय, धमन्या, शिरा, रक्तवाहिन्या, रक्तपेशी, केशिका यांचा समावेश होतो.