मानवी शरीर व इंद्रिय संस्था

रक्तवाहिन्या-रचना व कार्य

views

3:37
आपल्या शरीराच्या डाव्या बाजूवर हात ठेवला की आपल्याला धड-धड होत असल्याचे जाणवते. ह्रदयाची स्पंदने सतत चालू असतात, त्यामुळे रक्तवाहिन्यातही सतत रक्त फिरत असते. या रक्तवाहिन्या दोन प्रकारच्या असतात. 1) रोहिणी/ धमन्या 2) नीला(शिरा). त्यांची आता आपण माहिती घेऊ. रोहिणी/ धमन्या: आपल्या हृदयापासून शरीरातील वेगवेगळ्या भागाकडे रक्त वाहून नेले जाते. या रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या असे म्हणतात. या धमन्या खोलवर रुजलेल्या असून सर्व धमन्या ऑक्सिजन वाहून नेतात. मात्र फुफ्फुस धमनी ही ऑक्सिजन वाहून नेत नाही. धमन्यांची भित्तिका ही जाड असते. त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. नीला(शिरा): नीलाचे कार्य हे धमन्यांच्या विरुद्ध आहे. कारण शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला असे म्हणतात. फुफ्फुसातील म्हणजेच फुफ्फुस सोडून उरलेल्या सर्व नीलांमधून विनाक्षजती म्हणजेच कार्बनडायऑक्साईड युक्त रक्त वाहून नेले जाते. जास्तीत जास्त नीला ह्या त्वचेला लागून असतात. निलांच्या पोकळीमध्ये झडपा असतात.