मानवी शरीर व इंद्रिय संस्था

माहीत आहे का तुम्हांला

views

3:03
हृदय हे आपल्या शरीरात खूप महत्त्वाचे कार्य करते. निरोगी माणसाचे हृदय हे दर मिनिटाला 72 वेळा धडधडते. म्हणजेच एका मिनिटात 72 वेळा हृदयाचे ठोके पडतात. व्यायाम केल्यामुळे, किंवा शारीरिक कार्य जास्त केल्यामुळे तसेच मनात निर्माण होणाऱ्या भावनांमुळे हृदयाचे ठोके वाढत असतात. तर माणूस आराम करत असेल किंवा झोपला असेल तर हे हृदयाचे ठोके कमी होतात. लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या ही जास्त असते. हृदयाचे ठोके पडत असताना दोन प्रकारचे आवाज येतात. त्यातील एका आवाजाला ‘डब्ब’ व दुसऱ्या आवाजाला ‘लब्ब’ असे म्हणतात. आपले हृदय हे प्रत्येक ठोक्याला जवळपास 75 मिलीलिटर रक्त हे पुढे ढकलते अशा प्रकारे हृदय कार्य करीत असते.