मानवी शरीर व इंद्रिय संस्था

रक्त

views

4:57
रक्त हे वाहत असल्यामूळे आपल्याला ठोके अनुभवायला मिळतात. रक्त शरीरात सर्वत्र वाहत असते म्हणून बोट कापले किंवा जखम झाली तर रक्त शरीरातून बाहेत येते. आता आपण रक्ताविषयी माहिती अभ्यासूया. रक्त हा शरीराच्या सर्व भागांतून वाहणारा तांबडया रंगाचा अर्धपारदर्शक द्रव आहे. सूक्ष्मदर्शिकेखाली रक्ताच्या थेंबाचे निरीक्षण केले तर त्यामध्ये मोठे कण असल्याचे दिसून येते. हे कण म्हणजेच रक्तपेशी होत. या थेंबामध्ये प्लाझ्मा नावाच्या पातळद्रवात या पेशी तरंगत असतात. रक्त हा एक प्रवाही व लाल रंग असलेला पदार्थ आहे. रक्त ही एक द्रायू संयोगी ऊती आहे. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग हा लाल भडक असतो व त्याची चव खारट असते. मानवी शरीरामध्ये शरीराच्या 8% वजनाएवढे रक्त असते. त्याचा सामू (PH) 7.4 इतका असतो. रक्त हे रक्तद्रव म्हणजेच प्लाझ्मा व रक्तपेशी या दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते.