मानवी शरीर व इंद्रिय संस्था

रक्ताची कार्ये

views

4:54
1) वायूंचे परिवहन :- फुफसांमधील ऑक्सिजन हा पेशींपर्यंत पोहचवण्याचे कार्य रक्त करते. तसेच ऊतींकडून फुप्फुसांमध्ये कार्बन डाय ऑक्साइड (CO2) आणण्याचे कार्यही रक्त करते.2)पोषणतत्त्वांचे वहन (पेशींना खाद्य पुरवणे) :- अन्ननलिकेच्या भित्तीकेमधून ग्लुकोज, मेदाम्ले, आमिनो आम्ले, यांसारखी पचन झालेली साधी पोषणतत्त्वे रक्तात घेतली जातात व ही पोषणतत्वे प्रत्येक पेशीपर्यंत पोहचवली जातात.3) टाकाऊ पदार्थांचे वहन :- उत्सर्जन क्रियेद्वारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. तसेच युरिआ, अमोनिआ, क्रिएटिनीन इत्यादी नायट्रोजनयूक्त टाकाऊ पदार्थ उतींकडून रक्तात जमा केले जातात. त्यानंतर हे पदार्थ रक्ताद्वारे वृक्काकडे वाहून नेले जातात व त्यानंतर शरीराबाहेर टाकले जातात. 4) शरीररक्षण :- शरीराचे रक्षण करणे खूप आवश्यक असते. यामध्ये रक्ताचा सिंहाचा वाटा असतो. कारण रक्तामध्ये प्रतिपिंडाची निर्मिती होते. आणि ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कणांपासून शरीराचे रक्षण करतात. 5) विकर व संप्रेरक परिवहन :- विकरे आणि संप्रेरके हे रक्तात स्त्रवतात. तेथून ती ज्याठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे वाहून नेली जातात. 6) तापमान नियमन :- मानवी शरीराचे तापमान हे 37०c इतके असते. ते कायम राखले जाते कारण योग्य नियमनामूळे वाहिनी विस्फारण व वाहिनी संकोचन या क्रिया घडून येतात. 7) रक्त हे शरीरातील सोडिअम, पोटॅशियम यांसारख्या क्षारांचा समतोल राखण्यास मदत करते. 8) कधी कधी रक्त वाहत असल्यास गुठळी तयार करून जखम बंद केली जाते. हे महत्त्वाचे कार्य प्लेटलेट व रक्तद्रवातील फायब्रिनोजेन ही प्रथिने करतात. अशा प्रकारे आपण रक्ताची कार्य अभ्यासली आहेत.