मानवी शरीर व इंद्रिय संस्था

रक्तदाब

views

3:42
तुम्ही नेहमी मोठया व्यक्तीला बी.पी. चा त्रास आहे असे ऐकत असाल. बी.पी. म्हणजेच ब्लड प्रेशर. (Blood Pressure). हदयाच्या आकुंचन व प्रसरणामूळे धमन्यांमध्ये असणारे रक्त हे प्रवाहित ठेवले जाते. “आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो. त्यालाच रक्तदाब असे म्हणतात’’. शरीराच्या सर्व भागापर्यंत रक्त पोहचवण्यासाठी रक्तदाब हा योग्य असायला पाहीजे. हृदयाचे आकुंचन ज्यावेळी होते तेव्हा रक्त जोराने रक्तवाहिन्यांमध्ये ढकलेले जाते. त्याचा रक्तवाहिन्यांच्या अंतर स्तरावर दाब अधिक असतो. त्यावेळेस जो दाब नोंदविला जातो त्याला ‘सिस्टॅालिक दाब’ म्हणजेच आकुंचक दाब असे म्हणतात. व हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी जो दाब नोंदविला जातो त्याला ‘डायस्टोलिक दाब’ म्हणजेच प्रकुंचनीय दाब असे म्हटले जाते. निरोगी माणसाचा रक्तदाब हा 120 ते 80 मिमी ते 139 ते 89 मिमी मर्क्युरीच्या म्हणजेच पा-याच्या स्तंभाएवढा असतो. तो मोजण्यासाठी रक्तदाबमापक यंत्रामध्ये ‘स्पिग्मोमॅनोमीटर’ नावाचे यंत्र वापरले जाते.