प्रकाशाचे परावर्तन

परावर्तनाचे नियम

views

5:09
परावर्तनाचे नियम अभ्यासण्यापूर्वी आपण परावर्तनाशी संबंधित काही संज्ञांविषयी माहिती जाणून घेऊ. सर्वप्रथम आरशाची स्थिती दाखवणारी रेषा PQ काढा. त्यानंतर आपाती किरण AO व परावर्तित किरण OB काढा. आता आरशाची स्थिती दाखविणाऱ्या रेषेस 900 (अंशाचा) कोन करणारी रेषा ON ही O बिंदूतून काढा. या रेषेला स्तंभिका असे म्हणतात. याठिकाणी रेषा ON ही PQ ला लंबवत असल्यामुळे PON = QON =900 चे तयार झाले. या आकृतीत किरण AO हा आपाती किरण आहे, तर बिंदू O हा आपात बिंदू आहे. आणि किरण OB हा परावर्तित किरण आहे. रेषा ON ही स्तंभिका आहे. आणि आपाती किरण व स्तंभिकेमधील कोन AON हा आपतन कोन आहे. परावर्तित किरण व स्तंभिकेमधील कोन BON परावर्तन कोन आहे. मुलांनो या सर्व संज्ञांच्या व्याख्या आता आपण समजून घेऊ. स्तंभिका: पृष्ठभागाशी 900 चा कोन करणाऱ्या रेषेस स्तंभिका असे म्हणतात. आकृतीत NO ही स्तंभिका असून ती PQ या पृष्ठभागाशी 90० चा कोन करणारी लंबरूप रेषा आहे. आपतन कोन: आपाती किरणांमुळे स्तंभिकेजवळ जो कोन होतो त्याला आपतन कोन म्हणतात. आकृतीत AON हा आपतन कोन आहे. परावर्तन कोन: पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या किरणांमुळे स्तंभिकेजवळ जो कोन तयार होतो त्याला परावर्तन कोन म्हणतात. आकृतीत NOB हा परावर्तन कोन आहे.