प्रकाशाचे परावर्तन

कॅलिडोस्कोप(शोभादर्शी/चारुदर्शी)

views

3:03
आता आपण कॅलिडोस्कोप कसा बनविला जातो ते बघूया. सर्वप्रथम तीन समान आकारांचे आयताकृती आरसे घ्या. त्यानंतर हे तिन्ही आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने अशा पद्धतीने चिकटवा की, परावर्तक पृष्ठभाग हा आतमध्ये येईल. एक पांढरा कागद घेऊन तो त्रिकोणी स्वरूपात चिटकवून एक बाजू बंद करा. त्यानंतर काचेचे वेगवेगळ्या रंगाचे चार-पाच तुकडे घेऊन ते आरशाच्या पोकळीत टाका. त्यानंतर दुसरी बाजू कागदाने बंद करून त्या कागदाला एक छिद्र पाडा. त्या छिद्रातून उजेडामध्ये पहा. या छिद्रातून पाहिले असता काचेच्या असंख्य प्रतिमा दिसतील. कारण ह्या प्रतिमा तिन्ही आरशांत निर्माण झालेल्या परावर्तनामुळे तयार झाल्या आहेत. अशा प्रकारे या कॅलिडोस्कोपमध्ये प्रतिमा तयार होतात. मात्र कॅलिडोस्कोपचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एकदा तयार झालेली प्रतिमा ही पुन्हा सहजपणे तयार होत नाही. प्रत्येक वेळी पाहताना ही रचना वेगवेगळीच दिसून येते. खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करण्यासाठी तसेच वस्त्रोद्योग व्यवसायातील डिझायनर कॅलिडोस्कोपचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी करतात. तुम्ही वॉलपेपर पाहिले असतील तर तुम्हाला त्यातील पॅटर्नचे कॅलिडोस्कोपमधील पॅटर्नशी असणारे साम्य लक्षात येईल. परिदर्शी आपण एका कृतीद्वारे समजून घेऊया.