बेरीज बिनहातच्याची

उजळणी: दोन अंकी संख्यांची बेरीज

views

6:28
आज आपण दोन अंकी संख्यांच्या बेरजेचा सराव करूया. २३ + ३२ = ? सांगा २३ मध्ये किती एकक आणि किती दशक आहेत? 3 एकक आणि २ दशक बरोबर! ३२ मध्ये किती एकक किती दशक आहेत? २ एकक आणि ३ दशक. मग आता यांची मांडणी मी कशी करू? २३ मधील २ दशकाच्या घरात आणि ३ एककाच्या घरात लिहा. तसेच ३२ मधील ३ दशकाच्या घरात आणि २ एककाच्या घरात लिहा. अगदी बरोबर! आतापर्यंत प्रत्येक वेळेस मी तुम्हांला गणिते देत होते आणि तुम्ही त्यांची उत्तरे सांगत होता. पण आता तुम्हांला स्वत:लाच गणिते तयार करायची आहेत. मात्र गणिते तयार करताना एक लक्षात ठेवा: एककात किंवा दशकातील कोणत्याही दोन संख्या अशा असाव्यात ज्यांचे उत्तर ९ पर्यंतच असेल. उदा. २+७, ३+५, ३+३. पाहिलंत या एक अंकी संख्या आहेत. पण या सर्व संख्यांची बेरीज ९ पर्यंतच येते. तसेच जर दोन अंकी संख्या घेतल्या तर १७+२१, ४५+५२, ३५+३२. अशा प्रकारची गणिते तुम्हांला तयार करायची आहेत. खूपच छान! आता तुम्ही सर्वजण एक अंकी आणि दोन अंकी संख्यांची बेरजेची गणिते सहज तयार करू शकता आणि सोडवू शकता.