संख्यांचा लहान मोठेपणा

लहान मोठेपणा दाखवणाऱ्या चिन्हांची ओळख

views

4:58
संख्यांचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी ‘<’ किंवा ‘>’ चिन्ह वापरतात. त्यांचा अर्थ आणि वापर खालील उदाहरणांतून समजून घेऊ. 1. उदा. ३ < ७ येथे ३ ही संख्या ७ पेक्षा लहान आहे. म्हणून चिन्हाचे बंद असलेले टोक ३ कडे आणि उघडलेले टोक ७ कडे दाखवले आहे. म्हणून याचे वाचन ३ लहान ७ पेक्षा असे करायचे. 2. उदा. १ < ९ १ ही संख्या ९ पेक्षा लहान आहे. म्हणून चिन्हाचे बंद टोक १ कडे आणि उघडलेले टोक ९ कडे दाखवले आहे. म्हणजेच १ लहान ९ पेक्षा. आता आपण कोणत्याही दोन अंकी संख्या घेतल्या, तर त्यांच्यामधील लहानमोठेपणा कसा ठरवता येईल ते समजून घेऊ. तुम्हांला तर माहीतच आहे की दोन अंकी संख्यांमध्ये एक दशक असतो आणि एक एकक. मग सांगा दशक मोठा असतो की एकक? एककापेक्षा दशक मोठा असतो. कारण १ दशक म्हणजे १० एकक असतात. म्हणून जेव्हा २ अंकी संख्यांचा लहान मोठेपणा ओळखायचा असतो तेव्हा अशा संख्यांमध्ये ज्या संख्येतील दशक मोठा, ती संख्या मोठी असते.