खास बेरीज हातच्याची

एक अंकी संख्यांची हातच्याची बेरीज

views

4:05
याआधी आपण बेरजेची गंमत या पाठात बेरीज कशी करायची हे शिकलो. बेरीज म्हणजे एका संख्येत दुसरी संख्या मिळवणे. आज आपण खास बेरीज, हातच्याची म्हणजे काय? ते समजून घेणार आहोत. तुम्हांला एकक आणि दशक म्हणजे काय ते माहीतच आहे. तर मग हे पहा, इथे ८ काड्या आणि ४ काड्या दिल्या आहेत. या सर्व काड्या मिळून १२ काड्या झाल्या. आता आपण या काड्यांचे १० – १० चे बंडल बांधून दशक तयार करू. पहा या १२ काड्यांचा हा १० चा एक बंडल तयार झाला आणि या २ काड्या शिल्लक राहिल्या. म्हणजेच १२ मध्ये १ दशक आणि २ एकक असतात. इथे ७ ठोकळे आणि ८ ठोकळे दिले आहेत. हे ठोकळे म्हणजेच एकक आहेत. तर हे सर्व एकक मिळून १५ एकक झाले. आता या एककांचे १० – १० चे बंडल बांधून दशक तयार करू. पहा या १५ एककांचा हा १० चा एकच बंडल तयार झाला. आणि हे ५ एकक शिल्लक राहिले. म्हणजेच १५ मध्ये १ दशक आणि ५ एकक असतात. समजले? एककाच्या घरात ९ पेक्षा मोठी संख्या ठेवत नाहीत. म्हणून आपण १० चा गठ्ठा बांधून तो दशकाच्या घरात ठेवतो.