गोष्टीतील बेरीज Go Back प्रस्तावना views 5:02 आज आपण छोट्या छोट्या गोष्टीतून बेरीज कशी करायची ते पाहू. त्यासाठी आपण एक गोष्टरुपी उदाहरण सोडवू. उदाहरण: गौरीकडे १५ रुपये होते. आईने तिला आणखी २६ रुपये दिले. तर गौरीकडे एकूण किती रुपये झाले? बरोबर! तर बेरीज करताना प्रथम आपण हे गणित उभ्या मांडणीत मांडून घेऊ. १५ मधील ५ एककाच्या घरात लिहू. आणि १ दशकाच्या घरात लिहू. तसेच २६ मधील ६ एककाच्या घरात आणि २ दशकाच्या घरात लिहून दोघांमध्ये बेरजेचे चिन्ह देऊ. आता सांगा कशी बेरीज करू. सुरवात एककापासून करा. ६ एकक आणि ५ एकक मिळून झाले ११ एकक. यातील एककचा १ एककाच्या घरात उत्तरात लिहा. आणि दशकाचा १ दशकाच्या घरात डोक्यावर लिहा. दशकाच्या घरात १+२ म्हणजे ३ दशक आहेत. त्यामध्ये आणखी १ हातचा मिळावा. म्हणजे एकूण ४ दशक झाले. ते उत्तरात खाली लिहा. बरोबर! म्हणून गौरीकडे एकूण ४१ रुपये झाले. प्रस्तावना सोपी बेरीज दशक वाढवून किंवा कमी करून