वजाबाकी साठी दशक सुटा करू

दशक सुटा करू

views

3:31
आपण दशक तयार कसा करतात तो पहिला. १० चा १ गठ्ठा किंवा बंडल म्हणजे दशक. होय. हा १० चा बंडल सोडला की त्या दशकाचे १० सुटे तयार होतात. कसे ते आपण खालील गणितातून समजून घेऊ. माझ्याकडे १० पेन्सिलीचा हा एक बॉक्स आहे. आणि या ५ सुट्या पेन्सिली आहेत. यातील ७ पेन्सिली मला शेजारच्या वर्गातील बाईंना द्यायच्या आहेत. मग सांगा बर मी कशा देऊ त्यांना ७ पेन्सिली? पहा या माझ्याकडे हा १० पेन्सिलीचा १ बॉक्स आहे. तो प्रथम मी खोलते म्हणजेच दशक सुटा करते. आणि त्यातील सर्व पेन्सिली बाहेr काढून सुट्या करते. आता माझ्याकडे या १० पेन्सिली आणि या ५ पेन्सिली मिळून एकूण १५ पेन्सिली झाल्या. आता सांगा या १५ पेन्सिली मधून मी शेजारच्या वर्गात ७ पेन्सिली देऊ शकते की नाही? वि: हो बाई तुम्ही या १५ पेन्सिलीमधून ७ पेन्सिल शेजारच्या वर्गात द्या. म्हणजे तुमच्याकडे १५-७= ८ पेन्सिली शिल्लक राहतील. बरोबर उत्तर. कळले दशक सुता करून वजाबाकी कशी करायची ते?