वजाबाकी साठी दशक सुटा करू

दशक सुटा करून वजाबाकी (शाब्दिक उदाहरणे)

views

3:05
आता आपण काही वजाबाकीच्या शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास करूया. उदाहरण १) भावनाने ४३ झाडांपैकी २७ झाडांना पाणी दिले. आता किती झाडांना पाणी द्यायचे राहिले? एकूण झाडे ४३ दिली आहेत. आणि २७ झाडांना पाणी घातलेले दिले आहे. प्रथम हे गणित उभ्या मांडणीत लिहू. ४३ मधील ३ एककाच्या घरात आणि ४ दशकाच्या घरात लिहू. २७ मधील ७ एककाच्या घरात आणि २ दशकाच्या घरात लिहून वजाबाकीचे चिन्ह देऊ. ३ एकाकातून ७ एकक वजा होणार नाहीत म्हणून १ दशक मोकळा करू. आता दशकात राहिले ३ दशक आणि एककात झाले १०+३=१३ एकक. १३ एककामधून ७ एकक वजा केले असता राहिले ६ एकक. आणि ३ दशकातून २ दशक वजा केले असता राहिला १ दशक. ४३ – २७ = १६. म्हणजे एकूण १६ झाडांना पाणी घालायचे राहिले आहे. सोपे आहे ना शाब्दिक उदाहरण सोडवणे? अशा उदाहरणात केवळ काय करायचे आहे ते कळणे गरजेचे असते.