Data Entry

Inserting Chart

views

4:22
एखादी आकडेवारी मोठ्या प्रमाणात असेल तर ती अभ्यासणे आणि पडताळून पाहणे फार कठीण जात. पण तीच माहिती जर आलेख किंवा तक्त्यांच्या स्वरूपात असेल तर त्या माहितीचा अभ्यास करण्यास किंवा तुलना करण्यास सोपी वाटते. एक्सेलमध्ये चार्टचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, चार्ट निवडताना तो आपल्या माहितीसाठी योग्य असा निवडावा, म्हणजे त्याचा अभ्यास करणे इतरांनाही कठीण वाटणार नाही. उदा. समजा आपल्याला दोन गोष्टींमधील तुलना दाखवायची असेल, तर स्तंम्भालेख चार्टचा उपयोग करु शकतो, contribution म्हणजेच किती योगदान आहे हे दर्शवायचे असेल तर pai चार्ट, कार्य प्रक्रियेचा काळ दर्शविण्याकरीता lineचार्ट इत्यादी. चार्ट इन्सर्ट केल्यानंतर त्याला उचित शीर्षक देणे, आलेखामध्ये सांख्यिकी माहिती दर्शविणे, आलेखाची सूची दर्शविणे, स्तम्भांनुसार वेगवेगळे रंग देणे यामुळे माहितीचा अभ्यास करणे सोयीचे ठरते. यासाठी आपण एक प्रात्यक्षिक करणार आहोत.