कोन

प्रस्तावना

views

2:32
मुलांनो आपण पाचवीत कोन आणि कोनाचे प्रकार या घटकांचा अभ्यास केला आहे. आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये अनेकदा आपल्याला कोणता तरी कोन तयार झालेला दिसतो उदा. जर आपण आपल्या घरातील खिडकीचे निरीक्षण केले तर त्यामध्ये काटकोन तयार झालेला दिसतो. आपल्या हाताचे जर निरीक्षण केले तर दोन बोटांमध्येही कोन तयार होतो. त्याच बरोबर घड्याळाचे काटे, जमिनीशी लंब असलेला विजेचा दिवा, आपले घर व त्या बाजूला असलेल्यां जिना , गार्डन मधील विविध खेळणी ( झोका ) सर्वांमध्ये आपल्याला कोन जाणवतो. लघुकोन , काटकोन , विशालकोन, हे तीनही कोन आपल्याला ओळखता येतात .चला तर मग, आज आपण या कोनांविषयी आणखी माहिती घेऊया. या आधी उजळणी म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे . शिक्षक:- मुलांनो, मला सांगा आपल्या दोन बोटांमध्ये कोनाचा कोणता प्रकार तयार होतो? विद्याथी :- दोन बोटांमध्ये लघुकोन तयार झालेला दिसतो. शिक्षक शाब्बास! अगदी बरोबर. शिक्षक:- या घड्याळाच्या काट्यांमध्ये कोणता कोन तयार झाला आहे? विद्याथी:- घड्याळात विशाल कोन तयार झालेला आहे. शि: अगदी बरोबर ! म्हणजे आता तुम्ही चित्रावरून अथवा वर्णनावरून कोनाचा प्रकार ओळखू शकता. मुलांनो आता आपण कोन व कोनाचे घटक यांची उजळणी घेवूया.