कोन

कोनांची रचना

views

2:50
कोनांची रचना: आतापर्यंत आपण लघुकोन काटकोन आणि विशालकोन यांचा अभ्यास केला आहे .पण तुम्हाला माहिती आहे का? कोनाचे आणखीही काही प्रकार पडतात. त्यांचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे . यासाठी आपण दोन वेगवेगळ्या रंगांच्या काड्यांचा वापर करू आणि त्यातून वेगवेगळे कोन तयार करू. शून्यकोन : आता या दोन्ही काड्या आपण एकमेकांवर स्थिर ठेवल्या. पाहा त्यांच्या मूळ स्थितीत कोणता बदल झाला आहे का? तर नाही. यांच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झालेला दिसत नाही. या काड्यांमध्ये तयार झालेल्या कोनाला शून्य कोन म्हणतात . शून्य कोनाचे माप o0 असे लिहितात लघुकोन: आता आपण एक काम करू, या दोन काड्यांमधील एक काडी तशीच ठेवू. आणि दुसरी काडी थोडी पुढे सरकवू. पाहा बरं, हा झाला आहे लघुकोन. याचे माप निश्चितच 00पेक्षा मोठे असते. आणि 900पेक्षा लहान असते. म्हणून या कोनाला लघुकोन म्हणतात.