कोन

गणित माझा सोबती

views

3:08
गणित माझा सोबती: बरं का मुलांनो आपल्याला कोनांचे प्रकार आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून शिकता येतात. मला सांगा तुम्ही जत्रेतील आकाशपाळणा पाहिला आहे ना? वि: हो सर ! शि: या आकाशपाळण्यावर जे झुले लावलेले असतात, ते ठराविक अंतरावर असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील एक कोन तयार होत असतो. हा कोन कोणता असेल? वि: सर ते पाळणे एकमेकांपासून फार दूर नसतात. म्हणून त्या प्रत्येकामध्ये लघुकोन तयार होईल. शि: शाब्बास ! आपण यापूर्वी काही नवीन कोनांची माहिती घेतली. मग मला सांगा, बागेमधील सीसॉच्या खेळण्यातून कोणता कोन तयार होईल? वि: त्यातून सरळ कोन तयार होईल. शि: छान! तर अशाप्रकारे आपल्याला वातावरणातून विविध कोन शिकता येतील. शि::- बरं, आता शिकलेल्या कोनांच्या प्रकारांवरून आपण सरावासाठी काही उदाहरणे सोडवूया खाली काही कोनांचे माप दिले आहे. त्यावरून कोनाचा प्रकार कोणता ते तुम्ही मला सांगा. शि: 215 अंश चा कोन कोणता आहे? वि: सर हा प्रविशालकोन आहे. कारण याचे माप 180अंश पेक्षा मोठे आणि 360अंश पेक्षा लहान आहे. शि: बरोबर ! मग 360अंश चा कोन कोणता कोन आहे ? वि: पूर्ण कोन. कारण पूर्ण कोनाचेच माप 360अंश असते. शि: बरोबर !