प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह

बौद्ध धर्म

views

6:15
बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे होते. त्यांचा जन्म नेपाळ मधील लुम्बिनी वनात झाला. त्यांच्या आईचे नाव मायादेवी व पित्याचे नाव शुद्धोदन होते. गौतम बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ होते. सिद्धार्थ कोणी सामान्य माणूस नव्हता. नेपाळमध्ये ‘कपिलवस्तू’ नावाचे राज्य होते. तेथे शुद्धोदन राजा राज्य करीत होता. त्या राजाचा पुत्र म्हणजे सिद्धार्थ, म्हणजेच आपले गौतम बुद्ध. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणूच त्यांना ‘बुद्ध’ असे म्हटले गेले.बुद्धांविषयी एक दंतकथा सांगितली जाते. ती अशी: गौतम बुद्धांच्या जन्माच्या वेळी ज्योतिषांनी असे भाकीत केले होते की हा राजपुत्र अतिशय कोमल हृदयी असल्याने त्याला दु:खाचे दर्शन झाले तर तो विलासी जीवन सोडून देईल. आणि संन्यासी बनेल, असे सांगण्यात आले होते. म्हणून शुद्धोदन राजाने त्याच्या नजरेला दु:ख पडणारच नाही याची काळजी घेतली. मात्र एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या - चन्नच्या अडविण्यास न जुमानता, हाती रथाचे सूत्र घेऊन, सारथ्यास मागे सारून हा राजपुत्र खऱ्या जगाकडे रथ दौडत निघाला. आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती. पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. २९व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्नीस यशोधरेचे ओझरते, अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्ध राजवाड्याबाहेर निघाले. गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आणि वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच ‘उरुवेला’ या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले असता त्यांना सर्वोच्च ज्ञान म्हणजेच ‘बोधि’ प्राप्त झाली.. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य.