पृथ्विगोल, नकाशा तुलना क्षेत्रभेट Go Back भौगोलिक सहल , भूगोल दालन – अर्था views 3:17 भौगोलिक सहल:-क्षेत्रभेट किंवा भौगोलिक सहल ही भूगोलाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची पद्धत आहे. एखादे ठिकाण प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहिल्याने त्याच्या समग्रतेची जशी कल्पना येते, तशी केवळ पुस्तकातील वर्णन वाचून, चित्रे किंवा नकाशा पाहून येऊ शकत नाही. अशी क्षेत्रभेट घेऊन शिकण्यासारखी ठिकाणे खूप असतात. भूगोल दालन - अर्था:- शाळेत असलेला छोटा पृथ्वीचा गोल पाहिला असेल. ही पृथ्वीची प्रतिकृती असते. ती पाहिल्यामुळे पृथ्वीचा आस कसा कललेला आहे हे लक्षात येते. पृथ्वीवर महासागर कोठे आणि किती आहेत, खंडे किती आहेत ते पाहता येते. पृथ्वी स्वत:भोवती कशी फिरते ते समजते. अक्षांश – रेखांश म्हणजे काय ते समजून घेता येते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील मेन राज्यात यारमथ येथे एक भला मोठा पृथ्वीचा गोल आहे. हा जगातील सर्वात मोठा पृथ्वीगोल ‘अर्था’ या नावाने ओळखला जातो. हा पृथ्वीगोल फिरता असून त्याचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग खऱ्या पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाइतकाच आहे. आणि त्याचा सूर्याभोवती फिरण्याचा वेगही खऱ्या पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या वेगाइतकाच आहे. त्यामुळे आपल्याला पृथ्वीची यथायोग्य कल्पना येऊ शकते. पृथ्वीगोल व नकाशा तुलना भौगोलिक सहल , भूगोल दालन – अर्था