खडक व खडकांचे प्रकार

रुपांतरित खडक

views

6:11
अग्निजन्य खडक, गाळाचे खडक या शिवाय खडकांचा मुख्य तिसरा प्रकार म्हणजे रुपांतरित खडक होय. पृथ्वीच्या पृष्ठभागावर नेहमीच ज्वालामुखी, भूकंप आणि इतर भू-हालचाली होत असतात. या हालचाली घडताना अग्निजन्य तसेच स्तरित खडक मोठया प्रमाणावर दाब आणि उष्णता या प्रक्रियेतून जातात. त्यामुळे अग्निजन्य व स्तरित खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुन्हा स्फटिकीकरण होते. म्हणजे या बदलामुळे अग्निजन्य व स्तरित खडकांचे स्वरूप बदलून नवीन खडकात रुपांतर होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रुपांतरित खडक असे म्हणतात. म्हणजेच मूळच्या खडकांवर दाब व उष्णता यांचा परिणाम होऊन त्यांच्या संरचनेमध्ये बदल होतो आणि त्यांचे रूप पालटते. मूळचे रूप पालटलेल्या अशा खडकांना रूपांतरित खडक म्हणतात. अशा या रुपांतरीत खडकांत अग्निजन्य खड्कांप्रमाणे स्फटिकही असतात तर जलजन्य, गाळाच्या खड्कांप्रमाणे त्यांचे थरही असतात. रुपांतरीत खडकांची वैशिष्टये १. रुपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत. २. रुपांतरित खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते. ३. हे खडक वजनाला जड व कठीण असतात.