मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये

प्रस्तावना

views

4:14
मौर्य साम्राज्य म्हणजे ,प्राचीन भारतातील सर्वात बलशाली साम्राज्य होते. त्या साम्राज्याचा सम्राट अशोक याच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्य कमकुवत झाले. त्याच्यानंतर या साम्राज्याची सत्ता जेमतेम 50 वर्षे राहिली. आज आपण मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये म्हणजे इ.स 4 ते 16 व्या शतकातील भारतातील राज्यांची माहिती घेणार आहोत. त्यातील पहिले घराणे आहे शुंग घराणे. या शुंग घराण्यापासून आपण सुरवात करूया. सम्राट अशोकांनतर कमकुवत झालेले मौर्य साम्राज्य पुन्हा पूर्वपदावर येऊ शकले नाही. बृहद्रथ हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा होता. त्याच्या दरबारी पुष्यमित्र शुंग नावाचा सेनापती म्हणजेच सैन्याचा प्रमुख होता. या पुष्यमित्राने बृहद्रथ राजाविरुध्द बंड केले. पुष्यमित्राने बृहद्रथाची हत्या करून मगधाचे राज्य मिळविले आणि तो स्वत: राजा झाला. अशाप्रकारे त्याने शुंग घराण्याची स्थापना केली. पुष्यमित्र हा जन्माने ब्राम्हण व कर्माने क्षत्रिय होता. पुष्यमित्र शुंगाने 36 वर्षे राज्य केले. शुंग साम्राज्य पश्चिमेला सिंधु नदीपर्यंत तर दक्षिणेला नर्मदेपर्यंत होते. जे राजे मगध साम्राज्यातून बाहेर पडले होते त्यांना पुष्यमित्राने परत आपल्या साम्राज्यात सामावून घेऊन आपले साम्राज्य वाढवले. त्याकाळी भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राजांना ‘इंडो – ग्रीक राजे’ असे म्हंटले जात. मुलांनो, मौर्य राजांपैकी सम्राट अशोक हा जसा प्रसिद्ध राजा होता तसाच इंडो-ग्रीक राजांमध्ये मिनँडर हा राजासुद्धा प्रसिद्ध होता. हा पंजाबवर राज्य करणाऱ्या ग्रीक राजांमध्ये सर्वात उल्लेखनीय राजा होता. मिनँडर म्हणजेच मिलिंद. याला मिलिंदच्या व्यतिरिक्त ‘मिनँडर पहिला’ किंवा 'मिनांडर' या नावांनीसुद्धा ओळखले जाई.