मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये Go Back ईशान्य भारतातील राजसत्ता views 2:53 आपण ईशान्य भारतातील कामरूप या राज्याविषयी माहिती घेणार आहोत. पूर्वीचे कामरूप म्हणजे सध्याचे आसाम हे राज्य होय. परंतु कामरूप हे आसाम राज्यापेक्षा मोठे होते. ‘प्राग्ज्योतिश ’ हे शहर प्राचीन कामरूपची राजधानी होती. प्राग्ज्योतिश म्हणजे आजच्या आसाम राज्यातील गुवाहाटी हे शहर आहे. महाभारत आणि रामायणातही कामरूपचा उल्लेख प्राग्ज्योतिश या नावाने केला आहे. पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. हे राज्य इसवी सनाच्या चौथ्या शतकात उदयास आले होते. कामरूपचा उल्लेख प्रथम समुद्रगुप्ताच्या अलहाबाद येथील प्रयाग प्रशस्ति मध्ये केला गेला आहे.‘ पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ या पुस्तकात कामरूप प्रदेशाचा उल्लेख ‘किऱ्हादिया’ म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे . पेरिप्लस म्हणजे माहिती पुस्तक होय . ‘पुरिथ्रियन सी’ म्हणजे तांबडा समुद्र. ‘पेरिप्लस ऑफ द पुरिथ्रियन सी’ म्हणजेच तांबड्या समुद्राची माहिती सांगणारे पुस्तक होय. साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील हे पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिणारा खलाशी इजिप्त या देशात राहणारा होता.कामरूप राज्याचा विस्तार ब्रंम्हपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला होता . त्यावेळी भास्करवर्मन हा तेथील प्रसिद्ध राजा होता. भास्करवर्मन हा ब्राम्हण होता. आणि तो स्वतः ला विष्णूचे संतान मानत होता. युवान श्वांग, पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकातून कामरूप राज्याविषयी माहिती मिळते. तसेच उपलब्ध असणाऱ्या स्तंभालेखांवरूनही या राज्याची माहिती मिळते. प्रस्तावना कुशाणराजे गुप्त राजघराणे दुसरा चंद्रगुप्त वर्धन राजघराणे ईशान्य भारतातील राजसत्ता