मौर्यकालीन भारत

मौर्य साम्राज्य:चंद्रगुप्त मौर्य

views

4:3
मौर्य साम्राज्य इ.स.पूर्व ३२५ ते १८५ काळातील भारतातील प्राचीन साम्राज्य आहे. सम्राट मौर्यांचे भारतात १३७ वर्ष साम्राज्य होते याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केली. चंद्रगुप्त मौर्याची कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. त्यासाठी त्याला मदत केली ती त्याचा मंत्री चाणक्य याने. मगधाचा राजा धनानंद हा जनतेवर अन्याय, जुलूम करीत होता. त्याच्या राज्यकारभाराला जनता कंटाळली होती. अशा धनानंदाचा पराभव करून चंद्रगुप्ताने इ.स.पूर्व ३२५ च्या सुमारास मगध साम्राज्यावर सत्ता स्थापन केली. मगधांचे राज्य पूर्वेला गंगेच्या मैदानी प्रदेशापासून सुरु होत होते. मगधाची राजधानी पाटलीपुत्र होती. चंद्रगुप्त मौर्याने पूर्वेला असलेल्या या राज्याचा विस्तार पश्चिमेकडे करण्यास सुरुवात केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन, आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. हा विस्तार करत असताना त्याला सिकंदराच्या मृत्यूनंतर त्याच्या सत्रपांमध्ये सत्तेसाठी चालू झालेल्या लढायांचा फायदा झाला. त्यांच्यातील मतभेदांचा फायदा चंद्रगुप्ताने उठविला. सिकंदराचा सेनापती सेल्युकस निकेटर हा होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण करून परत हा प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु चंद्रगुप्ताने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी सामना करून त्याला परतून लावले.