त्रिमितीय वस्तू आणि घडणी

डोंगराची आकृती

views

2:58
डोंगराची आकृती: मुलांनो, तुम्ही सहलीला किंवा तुमच्या गावी जाताना डोंगर पाहिला असेलच. हे लांबवरचे डोंगर पाहताना तो किती उंच आहे किंवा किती लांबवर त्याचा विस्तार आहे याचा आपल्याला साधारण अंदाज येतोच. पण त्या डोंगराला एका बाजूने पाहत असताना आपल्याला हे कळत नाही की या डोंगराने जमिनीचा नेमका किती भाग व्यापलेला आहे. त्याची रुंदी किती आहे. पण जर तोच डोंगर तुम्ही वरून म्हणजे विमानातून किंवा हेलिकॉप्टर मधून पाहिलात तर आपल्याला तो डोंगर किती भागात पसरलेला आहे ते समजते. डोंगर किती भागात पसरलेला आहे हे समजण्यासाठी या दोन आकृत्या पहा. (या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील पान क्र. 76 वरील डोंगराच्या आकृत्या दाखवा) आकृती 1 मध्ये लाबूंन दिसणारा डोंगर आणि त्याच्या साधारण उंचीच्या रेषा दाखवल्या आहेत. जसे 200 मी, 400 मी, 600 मी आणि 800 मी. आणि आकृती 2 मध्ये वरून दिसणारी डोंगराची व्याप्ती दाखवली आहे. यात विविध उंचीचे भाग वेगवेगळ्या वक्र रेषांनी दाखवले आहे. जसे 800 मी दर्शवणारी रेषा साधारत: 800 मीटर उंची दाखवते. भूगोल विषयात नकाशामध्ये डोंगर दाखवताना अशाच प्रकारच्या आकृत्यांचा वापर केलेला असतो