भरती- ओहोटी

केंद्रोत्सारी बलाची उदाहरणे

views

3:23
केंद्रोत्सारी आणि गुरुत्वाकर्षण बलाची उदाहरणे समजून घेण्यासाठी आपण काही प्रयोग करूया. आपल्या वहीवर खडू ठेवून वही जोरजोराने डावीकडून उजवीकडे हलवली तर काय दिसते पहा. हा खडू वहीच्या पृष्ठभागावर गोल-गोल फिरतो आहे. आता तो फिरता-फिरता खाली पडला आहे. आणि हा खडू फिरत असताना तो ज्या दिशेने फिरतो आहे त्याच दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे पडला आहे. आता आपण एका कडीच्या डब्यात पाणी घेऊया आणि कडी हातात धरून हा डबा गरगर फिरवूया. पहा या कडीच्या डब्यातील पाण्यात गोल-गोल लहरी तयार होऊन डब्याच्या वरच्या बाजूला येताना दिसत आहेत. आपण घरी मिक्सरच्या भांड्यामध्ये फळांचा रस तयार करताना त्यात थोडे पाणी मिसळतो. त्यावेळी ते मिश्रणही ज्या दिशेने मिक्सरच्या भांड्यातील पाते फिरते त्याच दिशेने गोल- गोल फिरत वरच्या बाजूस येऊ लागते. घरातील छतावरचा पंखा फिरतो, तेव्हा केंद्रोत्सारी बल निर्माण होते आणि हवा बाहेरच्या बाजूला फेकली जाऊन वारा तयार होतो. गोफण फिरवताना झालेल्या केंद्रोत्सारी बलामुळे दगड बाहेरच्या बाजूला फेकला जातो. या सर्व कृतींचे नीट निरीक्षण केले तर आपल्याला दिसून येते की, खडू, डब्यातील पाणी, फळांचा रस, गोफण किंवा पंख्याचे पाते, कीचेन, पेल्यातील पाणी या सर्व वस्तू केंद्रातून बाहेरच्या दिशेने फेकल्या जाताना दिसतात. म्हणजेच या सर्व कृतींमध्ये केंद्रोत्सारी बलाचे परिणाम आपल्याला पहावयास मिळतात.